Ganesh Chaturthi Messages In Marathi

Ganesh Chaturthi Messages In MarathiDownload Image
सर्व शुभ कार्यात आधी पूजा तुझी,
तुज वीण काम न होणें, अर्ज ऐक माझी,
रिद्धी सिद्धी संगें करा भुवनात फेरी,
करा अशी कृपा नेहमी करू मी पूजा तुझी.
गणेश चतुर्थी व्रत ची हार्दिक शुभकामना

पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

जयघोष ऐकोनी देवा तुझा, जाहली कर्णरंध्रे मुग्ध नि गोड
कर जोडून उभा द्वारी, लागली तुझ्या आगमनाची ओढ ….सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात भरभरून सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येवो हीच प्रार्थना – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री गणेशाची कृपादृष्टी कायम तुमच्या पाठिशी राहावी, हीच प्रार्थना – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणेश चतुर्थीच्या या मंगलमय क्षणी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा!

आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो, कोणतेही संकट आपल्यावर न येवो. आपली भरभराट होवो हीच प्रार्थना – गणेश चतुर्थी शुभेच्छा!

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृद्धी ऐश्वर्या येवो हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फूर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया!

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत हीच सदिच्छा!

गणेश चतुर्थीनिमित्त आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी – गणपती बाप्पा मोरया!

बाप्पाचे होता आगमन, हरपून जाईन तनमन – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर असावा आणि तुमचा चेहरा सदैव हसरा दिसावा हीच इच्छा – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment