Good Morning Life Quotes In Marathi ( गुड मॉर्निंग जीवनावर मराठी कॉटस )

Good Morning Life Quotes In MarathiDownload Image
गुड मॉर्निंग
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते,
परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते,
पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावच” ठरवतो.

आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.

आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.

“आपण आयुष्यात किती खरे किंवा किती चुकीचे आहोत, ते फक्त देव किंवा आपलं अंतर्मन जाणते.”
गुड मॉर्निंग

आयुष्य हि फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याल ठाऊक नसत पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते .

आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन
आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार? सगळे इथेच सोडून जायचे हे.

आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. ,
आपण कसे दिसतो, ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
गुड मॉर्निंग

आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमविलेल्या वस्तुंपेक्षा स्वभावाने कमविलेली माणसं जास्त सुख देतात..
गुड मॉर्निंग

“जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात.
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं….
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते.
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं…गुड मॉर्निंग

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती कुणाची तरी हवी असते पण असे का घडते कि जेव्हा ती व्यक्ती हवी असते … तेव्हाच ते आपल्याजवळ नसते ?

आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.

शुभ सकाळ
जीवन सुंदर आहे, त्यावर प्रेम करा,
रात्र असेल तर काय, सकाळची वाट पहा.
संकट येतात, प्रत्येकाची परीक्षा घेण्यासाठी,
पण नशिबापेक्षा स्वता: वर विश्वास ठेवा.

आयुष्यात अनेक संधी चालून येतात. आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे. या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे. नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे ?

आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

!! शुभ सकाळ शुभ दिन !!
आयुष्य पण हॆ एक रांगोळीच आहे.
ती किती ठिपक्यांची काढायची हे नियतीच्या हातात असले तरी
तिच्यात कोणते व कसे रंग भरायचे हे आपल्या हातात असते..

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.

आयुष्य तुम्हाला मागे खेचत असेल
तर तुम्ही खुप पुढे जाणार आहात….
कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी
आधी मागे खेचावा लागतो….!!!
शुभ सकाळ

आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे . . .
हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत !!!

आपल्याला जे लोक आवडतात,
त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा….
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करायला शिका,
आयुष्य खूप सुंदर आहे
आणि ते आपल्याला अजून सुंदर बनवायला शिका ..!!!
शुभ प्रभात

आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

सुप्रभात
हसू ही Electricity असून
आयुष्य ही तिची Battery आहे..
जेव्हा जेव्हा आपण हसतो
Battery चार्ज होऊ लागते
अन् एक सुंदर दिवस
Activate होतो..
So Keep Smiling…

आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.

आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.

शुभ सकाळ
आयुष्याबद्दलच्या आपल्या तक्रारी जितक्या कमी होतील तितके आपले आयुष्य चांगले होईल!
हसत रहा, खुश रहा.

आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.

आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.

शुभ सकाळ
जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता, तुमच लक्ष ध्येयावर केंद्रित करा – अल्बर्ट आइंस्टीन

शुभ सकाळ
जीवन सर्वांसाठी सारखेच असते,
फरक फक्त एवढाच असतो,
कोणी मनासारखं जगात असतं आणि
कोणी दुसरायच मन जपून जगात असतं !

आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते,
आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो, 
मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा,
आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांना ही आनंदी ठेवा.
सुप्रभात।

जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका
जी जगासाठी सुंदर असू शकेल
परंतु अशा व्यक्तीशी करा जी
तुमचं जग सुंदर करून टाकेल
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
सुप्रभात

आयुष्यात काही शिकायच असेल तर
ते पाण्या कडुन शिकाव..वाटेतला खड्डा ‘टाळुन’
नाही तर ते नेहमी ‘भरून’ पुढे जाव..!!
शुभ प्रभात

॥ सुप्रभात ॥
आयुष्य म्हणजे अनुभव+प्रयोग+अपेक्षा
यांचे समीकरण आहे.
कालचा दिवस हा “अनुभव” होता.
आजचा दिवस हा “प्रयोग” असतो.
उद्याचा दिवस ही “अपेक्षा” असते.
म्हणून तुमच्या प्रयोगाला अनुभवाची जोड देऊन
तुमची अपेक्षा पूर्ण करा.
शुभ सकाळ – आनंदी दिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Good Morning Marathi Quotes On Life
  • Good Morning Alone Quotes In Marathi
  • Good Morning Relationship Quotes In Marathi
  • Good Morning Love Quotes In Marathi
  • Good Morning Motivational Marathi Quotes
  • Good Morning Marathi Quote On Ambition
  • Good Morning Marathi Happiness Quotes
  • Good Morning Quote In Marathi

Leave a comment