Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
प्रेम म्हणजे, समजली तर भावना,
केली तर मस्करी, मांडला तर खेळ.,
ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, रचला तर संसार ,
आणि निभावलं तर जीवन.
गुड मॉर्निंग
जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.
ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.
प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं
पण त्याचा सुगंध अनुभवायला
प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.
एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.
प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.
वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.
कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.
तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.
एका चुकीमुळे संपतं ते प्रेम
आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.
आयुष्यात प्रेम करा,
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.
देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल.
अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.
जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.
शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.
फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.
प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.
मनापासून प्रेम करणारा
कधीच वेडा नसतो कारण ते
वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी
मनापासून प्रेम करावं लागतं.
मन गुंतायला वेळ लागत नाही
मन तुटायलाही वेळ लागत नाही
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला
आणी तुटलेल्या मनाला सावरायला.
शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना?
अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?
प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !
वाटत कधी कुणी आपलही असाव..
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,
दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,
आपल्यालाही कुणीतरी भेटाव.
एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar