Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
गुड मॉर्निंग
जगातील सर्वात सुंदर गोष्टी पाहिल्या जाऊ शकत नाहीत किंवा स्पर्शही करता येणार नाहीत, त्या केवळ मनापासून अनुभवल्या जाऊ शकतात.
म्हणून आपलं हृदय सुदृढ ठेवा.
जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. ,
पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.
गुड मॉर्निंग
आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमविलेल्या वस्तुंपेक्षा स्वभावाने कमविलेली माणसं जास्त सुख देतात..
गुड मॉर्निंग
कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो,
परंतु मनाने ऐकलं तर शब्दांचा अर्थ समजतो….
गुड मॉर्निंग
दररोज चांगला नाही कदाचित,
पण प्रत्येक दिवशी काहीतरी चांगले असते.
गुड मोर्निंग
शुभ सकाळ शुभ दिन
“चंदन” पेक्षा “वंदन”
जास्त शीतल आहे.
“योगी” होण्यापेक्षा “उपयोगी”
होणे अधिक चांगल आहे.
“प्रभाव” चांगला असण्यापेक्षा
“स्वभाव” चांगला असणे महत्त्वाचे आहे.
शुभ सकाळ
जगण्यात मौज आहेच
पण त्याहून अधिक मौज
फुलण्यात आहे.
शुभ सकाळ
मनाने स्वीकारलेली परिस्थिती म्हणजे सुख होय.
शुभ सकाळ
असेल आनंदी नारी, सुख फुलेल घरीदारी.
शुभ सकाळ शुभ दिन
सकाळचा प्रणाम फक्त प्रथा नाही
तर तुमच्या काळजीची जाणीव आहे.
नाती जिवंत राहावीत व
आठवण सुद्धा राहावी म्हणून.
“ज्या अनुभवात तुम्हाला भितीचा सामना करावा लागतो,
तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य, व आत्मविश्वास वाढवतो”!
घरात रहा सुरक्षित रहा…!
शुभ सकाळ
शुभ सकाळ
काळोख, अंधार काढून टाकू शकत नाही;
फक्त प्रकाशच हे करू शकतो.
द्वेषयुक्त, द्वेषभावना काढून टाकू शकत नाही; केवळ प्रेमच ते करू शकते.
शुभ सकाळ
प्रत्येकात काही विशेष गुण असतातच पण जर तुम्ही माश्याची परीक्षा त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवर करू लागलात तर तुम्ही सर्व आयुष्य त्याला मुर्खच समजत राहाल – अल्बर्ट आइंस्टीन
दोन अक्षरांचे’ लक’, अडिच अक्षराचे ‘भाग्य’
तीन अक्षराचे ‘नशीब’ ऊघडण्या-साठी,
चार अक्षराची ‘मेहनत’ उपयोगाला येत असते,
तर एक अक्षराचा ‘मी’ माणसाचे जीवन नष्ट करते….!!
शुभ सकाळ
मैत्री आणि प्रेमाचं नातं कुठेही तयार होतं.
मात्र, ते रुजतं तिथेच जिथे आदर असतो.
शुभ सकाळ शुभ दिन
!! शुभ सकाळ शुभ दिन !!
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण
पावसात थांबण्याचे धाडस नक्की देवू शकते,
आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही
पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो ….
सुंदर विचार –
लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी…
आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन होण्यासाठी..
किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी…
क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी…
कितीतरी उत्तरे अपूर्ण राहतात जीवनाचं गणित सोडवतांना..
कधी आळसही कारणीभूत ठरतो जिंकता जिंकता हरतांना..
शुभ सकाळ
विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत
आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केलातर
आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे
दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर
शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.
शुभ सकाळ मित्रांनो
आयुष्य तुम्हाला मागे खेचत असेल
तर तुम्ही खुप पुढे जाणार आहात….
कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी
आधी मागे खेचावा लागतो….!!!
शुभ सकाळ
“महत्वकांक्षा” असल्याशिवाय माणूस “मेहनत” करित नाही
आणि”मेहनत” केल्याशिवाय” महत्वकांक्षा” पुर्ण होत नाही…!
आयुष्यात स्वत:ला कधी ‘उध्वस्त’ होऊ देऊ नका.
कारण लोक ‘ढासाळलेल्या’ घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत.
शुभ सकाळ
Tag: Smita Haldankar