Happy Daughters Day Status In Marathi

Happy Daughters Day Status In MarathiDownload Image
1. मी नसेल आई दिवा वंशाचा,
मी आहे दिव्यातील वात,
नाव चालवेन कुळाचे बाबा,
मोठी होऊनी जगात.
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा

2. एक तरी मुलगी असावी, कळी उमलताना पाहता यावी, मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

3. पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते, अशी कळी मग गर्भातच का नकोशी वाटते. मुलींना जगवा, मुलींना वाचवा. कन्या दिनाच्या शुभेच्छा

4. मुली नेहमीच स्पेशल असतात, कारण त्यांच्याशिवाय घराला शोभा नाही. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

5. लेक हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही. माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझा आभारी आहे. जागतिक कन्या दिन शुभेच्छा

6. लेक वाचवा, देश घडवा. कन्या दिनाच्या शुभेच्छा

7. लेक असते ईश्वराचं देणं, तिच्या पाऊलखुणांनी सुखी होईल आमचं जिणं. कन्या दिनाच्या शुभेच्छा

8. जशी सायलीची कळी, सोनचाफ्याची पाकळी तशी माझी…जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

9. स्वागत तुझे मी असे करावे, अचंबित हे सारे जग व्हावे, तुझ्या गोड हास्याने जीवन माझे फुलूनी जावे. कन्या दिनाच्या शुभेच्छा

10. प्रत्येक क्षण आता आनंदाने सजला, तुझ्या रूपाने माझ्या घरी सौख्याचा चरणस्पर्श झाला. जागतिक कन्या दिन शुभेच्छा

11. सुगंध, प्रेम आणि मुली, हे जिथले असतात तिथे थांबत नाहीत. त्यामुळे मुलींवर भरपूर प्रेम करा आणि त्यांच्या सहवासाचा सुगंध दरवळत राहू द्या. जागतिक कन्या दिन शुभेच्छा

12. प्रत्येक कुटुंबाचं कुळ वाढवतात मुली, पण तरीही का पायाखाली तुडवल्या जातात मुली, मुलींना प्रेम द्या आणि कुटुंबही वाढू द्या. कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

13. घरामध्ये जणू संगीत असतं प्रत्येक क्षणी, जेव्हा मुली पैंजण घालून घरभर चालतात. घरामध्ये प्रसन्नता ही मुलींमुळे असते, कारण त्यांच्यामुळे घरांमध्ये असतो प्रकाश. डॉटर्स डे च्या शुभेच्छा.

14. मुलीला हसताना पाहिलं, तेव्हा मी विचारलं काय झालं. तर म्हणाली बाबांनी मला आज त्यांचा मुलगा म्हटलं आहे. जागतिक कन्या दिवस शुभेच्छा

15. उमलणाऱ्या कळ्या म्हणजे मुली, आईबापांचं दुःख समजणाऱ्या मुली, घराला देतात घरपण मुली, मुलं आज असतील तर येणारं भविष्य आहेत मुली. जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment