Happy Diwali Shubhechha In Marathi

Happy Diwali Shubhechha In MarathiDownload Image
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली च्या शुभेच्छा!

सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव,
असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.

हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव,
मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार.
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा

अंधार दूर झाला रात्रीसोबत, नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन,
डोळे उघडा एक मेसेज आला आहे, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.

दिवाळीचा उत्सव फटाक्यांविना साजरा करायचा आहे,
सुरक्षित आणि सार्थक आनंद मिळवायचा आहे. स्वच्छ भारत आणि
सुंदर निसर्गाला कायम ठेवायचं आहे.

मोठ्यांचा मिळो आशिर्वाद, आपल्यांची मिळो साथ, आनंद मिळो जगभरातून,
देवाकडून मिळो भरभराट, हीच मनापासून आहे इच्छा दिवाळीसाठी खास.

प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद,
घराघरात होवो दिवाळी, प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी, प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी
आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ, सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून मनात ठेऊ नये शंका
आणि शुभेच्छांमध्ये असो गोडवा.

हात पकडून पुन्हा खेळूया, आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया, विसरून जुने हेवे-दावे,
चला मिळून दिवाळी साजरी करूया.

चला आज पुन्हा एकदा दीप लावूया, रूसलेल्यांना मनवूया,
डोळ्यातील उदासी दूर करून जखमांवर फुंकर घालूया.
चला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया.

वर्षभर शेजाऱ्यांना तोंड दाखवू नका पण दिवाळीच्या वेळी फराळ खायला मात्र नक्की जा.

दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा, आपल्या मेंदूला आणि बुद्धीला गणेशासारखं बनवा.
सर्वांना भरपूर शुभेच्छा द्या आणि दिवाळीचा आनंद लुटा.

आम्ही जेव्हा आकाशात आतिषबाजी करतो आपल्या दुःखाना धुराप्रमाणे दूर करतो,
यंदा भेटूया सारे आणि दुःखांना करूया असंच दूर, सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

दिवाळीच्या तुम्हाला याच शुभेच्छा की, तुम्ही मातीलाही हात लावल्यास तिचं सोनं होवो,
हीच प्रार्थना आहे तुम्ही खूष रहावं आणि तुमचा आनंद द्विगुणित होवो.

आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल, सुफळ जीवनासाठी सजावट,
वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके, यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई
आणि देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे. शुभ दिवाळी.

दिवे तेवत राहो, सर्वाचं घर प्रकाशमान होवो, सर्व स्वप्नं पूर्ण होवो,
हे दिवस असेच झगमगत राहोत, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

धनाचा होवो वर्षाव, सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव,
मिळो नेहमी समृद्धी अशी होवो खास तुमची आमची दिवाळी.

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Diwali Marathi

Tag:

Leave a comment