Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
1. पांढऱ्या शुभ्र दुधात
दिसे पौर्णिमेचे चांदणे
वाढो स्नेह मनातला
जसा वाढला कोजागिरीचा चंद्र
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
2. विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा तो चंद्रमा पाहा रे
असतो नभात रोज तो एकटाच रात्री
पण आजच्या निशेला ताच्या सवे राहा रे
चषकातुन दुधाच्या प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही कोजागिरी करा रे
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
3. शरदाचं टिपूर चांदणं, कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात, करू जागरण एकत्र
मसाले दुधाचा गोडवा, नात्यामध्ये येऊ दे
आनंदाची उधळण. आपल्या नात्यात होऊ दे
4. नाजूक गोऱ्या दंडात माझ्या राया चंद्रकोर ही गोंदवा
रात झोंबते अंगाशी बघा अन देहास जाळी हा चांदवा
शृंगार हा केला तुमच्यासाठी नका घालवू वेळ वाया
सरत चालली रात इश्काची कसं कळेना तुम्हा राया
का अशी करा सैल मिठी जागवू या ना रात सारी
केशरी हे दूध घ्या करू साजरी कोजागिरी
कवि – पांडुरंग जाधव
5. चंद्र हा हसला रात्रीच्या वेळेला
देईल प्रकाश साऱ्या दुनियेला
रातराणीचा सुगंध भारी त्याच्या सोबतीला
हा दिवस त्याचा न्यारी शोभून दिसे तो दुधात भारी
सण हा आनंदाचा कोजागिरी पौर्णिमेचा
कवियित्री – कविता गवारी
6. बहरून आली रात मंडळी जमली अंगणात
जशा जमल्या चांदण्या सभोवती चंद्राच्या नभात
7. कोजागिरीच्या रात्री क्षीर किरणांच्या सरी
आल्या नाचत भूवरी आज असे कोजागिरी
रथ चंद्राचा आगळा नभी चमके दीपमाळा
गीत रोहिणीचे गळा साजे लावण्य मखरी
खुले शरदाचा संसार कळ्या फुलांचा शृंगार
रजकाचा वाहे पूर श्वेत वस्त्र अवनीधरी
नभी सूर्य चंद्र जोडी गाडी ब्रमांडाची ओढी
दुग्ध अमृताची गोडी गोपी निघाल्या बाजारी
8. कोजागिरीचा शशी उगवला नभात
तेजाने उजळले सारे नभांगण
तेजोमय झाल्या दाही दिशा
शरदाच्या चांदण्यात न्हावून निघाल्या जशा
हवेतला हा सुखद गारवा
नेहमीच वाटे मज हवा हवा
9. अशा या मंद धुंद रात्रीच्या प्रहरी
आपली प्रीत नकळत बहरली
कोजागिरीची रात अशी ही फुलली
नकळत सुख स्वप्नांना कवेत घेऊन आली
कवियित्री – प्राची साठे
10. चांदणे आतूुरतेने पसरले क्षितीजावरी
सखर आणि मेवा घेऊन केसर पडले दुधावरी
तो निरागस चंद्रमा केव्हा येईल हो अंबरी
जागते आहे कविता मामझी करण्या साजरी कोजागिरी
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar