Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
1. एखादे चांगले काम पूर्ण करण्यासाठी, वाईट उपायांचा वापर करू नये.
2. “स्व:ताच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले.”
3. “सत्कर्म करण्याने वैभव मिळणार नाही परंतु शांती‚सुख मिळेल, तर दुष्कर्म करण्याने वैभव मिळेल पण शांती‚सुख मिळणार नाही, हे निश्चित.”
4. “मानवासाठी अनेक धर्म अस्तित्वात आले पण धर्म सगळ्या मानवांसाठी का निर्माण झाला नाही.”
5. मनुष्य सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि सर्व मानवांमध्ये स्त्री श्रेष्ठ आहे. महिला आणि पुरुष जन्मापासून मुक्त आहेत. म्हणूनच, दोन्ही अधिकारांना समान हक्क उपभोगण्याची संधी मिळाली पाहिजे.”
6. मासा पाण्यात खेळतो त्याला गुरूची आवश्यकता नसते.
7. स्वार्थाला वेगवेगळी रूपं मिळतात.हे कधी जातीचे तर कधी धर्माचे रूप धारण करते. – महात्मा ज्योतिबा फुले
8. मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा.
9. स्व कष्टाने पोट भरा. – ज्योतिबा फुले
10. स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय
11. कोणताही धर्म हा ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य आणि जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे – महात्मा फुले
12. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे.
13. कष्टाने जगण्याची धमक नसणारे लोक संन्याशी, भिक्षुक होतात. प्रपंच खरा नाही, व्यर्थ आहे, असा भ्रम ते प्रपंचातील व्यक्तिंमध्ये निर्माण करतात. – महात्मा फुले
14. सर्वसाक्षी जगत्पती, त्याला नकोच मध्यस्ती – महात्मा फुले
15. निर्मात्याने एकंदर सर्वच प्राणीमात्रांना निर्मिताना मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्मिले आहे. त्यास आपापसातील सर्व कक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ बनवले आहे. – महात्मा फुले
16. निर्मात्याने सर्व स्त्री – पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे. एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे. – महात्मा फुले
17. जे कोणी आपले कुटुंब, भाऊबंद, सगेसोयरे, इष्टमित्र आणि साथीदारांना आपल्यासह श्रेष्ट मानून इतर कोणाही स्त्री-पुरुषांस किंवा एकंदर मानव प्राण्यास पिढीजातपणे अथवा कपटाने अपवित्र किंवा नीच मानत नाहीत त्यास ‘सत्यवर्तनी’ म्हणावे. – महात्मा फुले
18. स्त्री अथवा पुरुष एकंदर सर्व गावाचे , प्रांताचे , देशाचे , खंडाचे संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वताच्या संबंधात , स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी अथवा एकमेकात एकमेकांनी कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे. – महात्मा फुले
19. निर्मात्याने सर्व स्त्री आणि पुरूषांना धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे – महात्मा फुले
20. स्वकष्टाने जगण्याची धमक हवी
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar