Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
1. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते – महात्मा ज्योतिबा फुले
2. नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.
3. केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे, चामाड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे
4. भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे
5. समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.
6. ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात – महात्मा ज्योतिबा फुले
7. जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका.
8. विद्वेविना मती गेली,मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका महाविद्वेने केले.
9. जाती आणि लिंग यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे एक प्रकारे पाप आहे.
10. मानवाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तवा, ज्योती म्हणे
11. जर विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व कष्टांचे निवारण करण्याचे मार्ग आपल्याला लाभतील
12. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात.ज्यांना कुठलेतरी उद्दिष्ट गाठायचे असते
13.आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे – महात्मा ज्योतिबा फुले
14. “कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.”
15. “देव एक आहे आणि सर्व माणसे ही त्याची मुले आहेत.”
16. “देव लग्नाच्या जोड्या स्वर्गात बांधतो मग तर मग त्या जोड्या एकाच जातीत का असतात ,देव जातीवादी आहे का?
17. “जोपर्यंत अन्न आणि वैवाहिक संबंधांवर जातीय संबंध कायम राहतील तोपर्यंत राष्ट्रवादाची भावना विकसित होणार नाही.” – महात्मा ज्योतिराव फुले
18. “दुसऱ्या व्यक्तीचे हक्क हिरावून घेवू नये – महात्मा ज्योतिराव फुले
19. देव आणि भक्त यामध्ये मध्यस्थाची गरज नाही
20. सत्य पालन हाच एक धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत – महात्मा ज्योतिबा फुले
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar