Republic Day Poem In Marathi

Republic Day Poem In MarathiDownload Image
1. असा भारत हवाय … जिथे सगळ्यांची जास भारतीय असेल
धर्म देश प्रेम उच्च नीच भेदभाव सीमा पार असेल
नातं असेल भारतीयत्वाचा…
सुख शांती समाधान मिळेल
शत्रूचा थरकाप उडवील.. एवढी विचारांना धार असेल
प्रत्येक भारतीयाचा अन्यायावर होणारा वार असेल
जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारताविषयीचा आदर असेल

2. मातृभूमी ही अजिंक्य.. विश्वात साऱ्या वंद्य संस्कृती ,
कण कण मातीचा बोले हर्षे, विश्वास प्रेम इथे नांदती
संपन्न इतिहास अन, युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती
हर मनात हृदयात अन, हुंकार एकमेव जय भारती || (सचिन कुलकर्णी)

3. पोहायचे असेल तर समुद्रात पोहा
नदी नाल्यात पोहण्यात काय अर्थ आहे
प्रेम करायचे असेल तर देशावर करा
कारण लोकं फसवतील पण देश तुम्हाला कधीही फसवणार नाही

4.स्फूर्ती देतिल हेच आमुचे राम कृष्ण हनुमान
व्यासादिक मुनिवरे गाइला
संत महंते पावन केला
प्रताप शिवबाने गाजविला
सुखसमृध्दिनिधान
चिंतनि इतिहासाच्या दिसती
असंख्य नरवीरांच्या ज्योती
गाता स्वतंत्रतेची किर्ती
घडवू नव संतान
धर्मासाठी जीवन जगणे
समष्टिमध्ये विलीन होणे
सीमोल्लंघन दुसरे कसले
यासाठी बलिदान

5.झेंडा आमुचा प्रिया देशाचा
फडकत वरी महान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
लढले गांधी याच्याकरिता
टिळक, नेहरू लढली जनता
समरधूरंधर वीर खरोखर
अर्पुनि गेले प्राण
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
भारतमाता आमुची माता
आम्ही गातो या जयगीता
हिमालयाच्या उंच शिरावर
फडकत राही निशाण
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
या देशाची पवित्र माती
जूळती आमुच्या मधली नाती
एक नाद गर्जतो भारता
तुझा आम्हा अभिमान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
गगनावरी आणि सागरतिरि
सळसळ करिती लाटा लहरी
जय भारत जय, जय भारत जय, गाता ती जयगान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम

6.घडतोय बदल
चढतेय वीटेवर वीट
मिटतेय गुलामी
आपण होतोय धीट
उठत आहेत प्रश्न
कुरवाळतोय शंका
अन्यायाविरुद्ध
कुणी वाजवतोय डंका
पसरतेय महिती
हक्कासाठी भांडतोय
उलट सुलट का होईनात
आपण विचार मांडतोय
घडवितोय देश आपला
अंतराळी इतिहास
उद्याच्या चैतन्यावर
दृढ होतोय विश्वास
कोपर्‍यातल्या झोपडीमध्ये
प्रगतीची इच्छा दिसतेय
पुस्तकाच्या बाजारातही
आशेची पालवी रुजतेय
भारतीय असण्याचा वाटे
मनापासून अभिमान
बलाढ्य सुंदर समृद्ध स्वतंत्र
माझा भारत देश महान

7.बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो॥
हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥
वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन
हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥
हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥
करि दिव्य पताका घेऊ प्रियभारतगीते गाऊं
विश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो॥४॥
या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो॥५॥
ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल
जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो॥६॥

8. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

9.या आपण नतमस्तक होऊ ज्यांच्यामुळे हा दिवस आपण पाहतो आहे
नशीबवान आहे हे रक्त जे देशाच्या कामी आलं आहे

10. सलाम करा या तिरंग्याला
जी तुमची शान आहे…
मान नेहमी वर उंच ठेवा
जो पर्यंत प्राण आहे…
जय हिन्द, जय भारत

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Republic Day Quotes In Marathi
  • Republic Day Image In Marathi
  • Republic Day Status In Marathi
  • Happy Republic Day Wishes In Marathi
  • Republic Day Marathi Wishes
  • Marathi Shayari on Republic Day
  • Republic Day Marathi Message Pic
  • Republic Day Marathi Greeting Pic
  • Happy Republic Day Marathi Status

Leave a comment