Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ…
शुभ सकाळ..!
शुभ सकाळ
उमललेल्या फुलांप्रमाणे ओठांवर हसू असो,
जीवनात दुःख नसोत, असहायता नसोत.
आयुष्याच्या या प्रवासात कायम आनंदात रहा,
आपण जिथे राहोत तिथे आनंदच असो. तुमच्याशी आमचे गोड नाते हीच आमची सर्वात मोठी संपत्ती आहे.
तुमच्या डोळ्यांना जागविले आहे आम्ही,
गुड मॉर्निंग ची फरज निभावली आहे आम्ही,
नका समजू की झोपलेलो आहे आम्ही,
आज तुमच्या आधी तुमची आठवण केली आहे आम्ही.
शुभ सकाळ
!! शुभ सकाळ शुभ दिन !!
फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे.
हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.
भेटुन तर सर्वजण आंनदी होतात.
पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे
“दिव्याने दिवा लावत गेल कि दिव्यांची एक “दिप माळ” तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि फुलांचा एक “फुलहार” तयार होतो..
आणि माणसाला माणूस जोडत गेलं की
“माणुसकीचं” एक सुंदर नातं तयार होतं…
||शुभ सकाळ||
आहात तुम्ही ‘सावरायला’
म्हणुन ‘पडायला’ आवडते,
आहात तुम्ही ‘हसवायला’
म्हणुन ‘रडायला’ आवडते,
आहात तुम्ही ‘समजवायला’
म्हणुन ‘चुकायला’ आवडते,
माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे “सगळे “
म्हणुन
मला “जगायला” आवडत!!!!!
शुभ सकाळ..!
गोड माणसांच्या आठवणींनी…
आयुष्य कस गोड बनत…
दिवसाची सुरवात अशी गोड झाल्यावर..
नकळंत ओठांवर हास्य खुलत…
शुभ प्रभात..शुभ दिवस…
प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
शुभ सकाळ
परिचयातुन जुळते ती मैत्री,
विश्वासाने जपते ती मैत्री,
सुखात साथ मागते ती मैत्री,
आणि दुःखात साथ देते ती मैत्री,
चुकावर रागवते ती मैत्री,
यशावर सुखावते ती मैत्री,
पापण्यातील अश्रुंना गोठवते ती मैत्री,
डोळ्यातील भाव ओळखते ती मैत्री,
आणि
एकमेकांचा मान ठेवते ती मैत्री…
शुभ सकाळ
सुप्रभात
टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात..
शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात..!
खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरुन तर सारेच जेवतात..
प्यावे तर दुसर्याच्या दुःखाचे विष, सुखाचे घोट तर सारेच घेतात..!
जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी तर सगळेच जगतात.
आपला दिवस आनंदात जाओ
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ…
शुभ सकाळ..!
मंगेश पाडगावकरांची एक अप्रतिम कविता
आयुष्य हे
विधात्याच्या वहीतील पान असतं….!
रिकामं तर रिकामं,
लिहिलं तर छान असतं…!
शेवटचं पान मृत्यू अन्
पहिलं पान जन्म असतं…!
मधली पाने आपणच भरायची,
कारण ते आपलंच कर्म असतं…!
होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,
कुठलंच पान कधी गाळायच नसतं….!
चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं,
कारण त्यातूनच
आपल्याला पुढे शिकायचं असतं…..!
शुभ सकाळ !
शब्दांनी जाई फुलांच्या मी माळून काव्य लिहावे
ते फूल मनातील कळीच्या हरपुन भान फुलावे
शब्दांच्या निशिगंधाने मग ऐसे गंधाळावे
की वादळ वारयाने ही झूळूक बनून फिरावे
शब्दातुन माझ्या मनीचे पाखरू तुला बिलगावे
मी सहज म्हणून लिहावे शब्दां पलीकडले व्हावे……
शुभ सकाळ.!
शुभ सकाळ..!
नाती जपण्यात मजा आहे
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar