नाही म्हणा तंबाखुला, सुखी राही संसार आपला.
तंबाखू खावून नको मारू पिचकारी,
घाणेरडा म्हणतील लोकं तुला सारी.
व्यसना मागे पळु नका, तंबाखू मळु नका.
तंबाखूचा विडा,पहिला सोडा.
बसु नका तंबाखू खात, होईल आयुष्याचा घात.
तंबाखूची पुडी, जणू विषाची फडी.
करू नका तंबाखूचे सेवन, कॅन्सरपुढे आत्मसमर्पण.
तंबाखू ची नशा करी अनमोल जीवांची दुर्दशा.
तंबाखूला ज्याने कवेत घेतले, त्याने मृत्यू जवळ आणले.
घ्याल तंबाखूची साथ तर आयुष्य होईल बरबाद.
समाजात कमी होईल सन्मान, थुंकू नको खावून पान,
संस्कार,संस्कृती विसरू नको, तंबाखूसाठी हात पसरू नको.
बंद करा बंद करा तंबाखूला हद्द पार करा