Ashadhi Ekadashi Marathi Messages

अषाढी एकादशी शुभेच्छा

सुप्रभात!
बोला पुंडलिक हरी विठ्ठल!!

पाणी घालतो तुळशीला !
वंदन करतो देवाला !
सदा आंनदी ठेव
माझ्या मित्रांना.
हिच प्रार्थना पाडुरंगाला
सर्वांना
आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.

मुख दर्शन व्हावे आता ..
तु सकळ जनांचा दाता..
घे कुशीत या माऊली..
तुझ्या चरणी ठेवितो माथा..
माऊली माऊली रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
सर्वांना आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.

तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।
राम कृष्ण हरी माऊली।।

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
शुभ आषाढी एकादशी

!!…जय हरी विठ्ठल….!!
विठ्ठलाची ओढ किती गोड गोड
जोडूनिया कर फुले मन
तोच भासे दाता तोची मातापिता
विसर जगाचा सर्वकाळ ….
विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हारे चिंता व्यथा क्षणार्धात ….
सोड अहंकार, सोड तु संसार
क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून …

माझे माहेर पंढरी |
आहे भिवरेचे तिरी || बाप आणि आई |
माझी विठ्ठल रखुमाई || पुंडलिक आहे बंधू |
त्याची ख्याती काय सांगू || माझी बहिण चंद्रभागा |
करीत असे पापभंगा || एकाजनार्दनी शरण |
करी माहेराची आठवण ||
!!…..जय हरी विठ्ठल…..!!

!!…जय हरी विट्ठल …!!
सदा पै परिपुर्ण जयाचे रुपडे !
तेथेचि माजीवडे मन करी !!
होईल उद्धार सुटेल संसार !
सर्व मायापुर दुरी होय !!
कांठाळा कायेचा दुरावा मायेचा !
हेचि जप वाचा स्मरे नाम !!
नामा म्हणे करी सर्व हरी हरी !
राम हे उत्तरी वाखाणी पा !!

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरे ।
परती माघारें घेत नाहीं ॥२॥
बंधनापासुनि उकलल्या गांठी ।
देतां आली मिठी सावकाश ॥३॥
तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें ।
कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥
शुभ आषाढी एकादशी

चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी
दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!!

विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल,
तुला साद आली तुझ्या लेकरांची
अलंकापुरी आज भारावली
वसा वारी चा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळा भेट घेण्या भिमेची निघाली
तुझ्या नामघोषात इंद्रायणी
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल.

Leave a comment