✐ ऊसाचे मांडव सजूया आपण
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामिल
मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण
तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!
✐ अंगणात उभारला विवाह मंडप
त्यात सजली ऊस आणि
झेंडूंच्या फुलांची आरास
तुळशी विवाह साजरी करुया आपण
कारण आज दिवस आहे खास
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
✐ ज्या अंगणात तुळस आहे,
ती तुळस खूप महान आहे,
ज्या घरात असते ही तुळस,
ते घर स्वर्गासमान आहे.
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
✐ सर्वात सुंदर तो नजारा असेल
जेव्हा भिंतींवर दिव्यांची माळ असेल
प्रत्येक अंगणात तुळस विराजमान होईल
जेव्हा तुळशीचा विवाह होईल
तुळशी विवाहाच्या खूप सा-या शुभेच्छा
✐ तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान
उठोनिया प्रात:काळी करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
✐ अंगणात तुळस,
आणी शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची ओळख..
माणसात जपतो माणुसकी आणी
नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख…
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
✐ आज सजली तुळस
शालु हिरवा नेसून,
कृष्ण भेटीसाठी तिचं
मोहरला पान पान..
अंगणात उभारला
आज विवाह मंडप,
ऊस झेंडूच्या फुलांची
त्यात सजली आरास..
मुळे सजवली तिची
आज चिंच आवळ्यांनी,
आणि रांगोळी घातली
गुलाबाच्या पाकळ्यांनी..
आहे साताचा मुहूर्त
करू नका हो उशीर,
पण येताना जरूर
तुम्ही आणावा आहेर…
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!