✐ एक तरी मुलगी असावी, कळी उमलताना पाहता यावी, मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
✐ पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते, अशी कळी मग गर्भातच का नकोशी वाटते. मुलींना जगवा, मुलींना वाचवा. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ वंशाचा दिवा मुलगा असेल…पण’ती’च नसेल तर दिवा कसा लागेल. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ मुली नेहमीच स्पेशल असतात, कारण त्यांच्याशिवाय घराला शोभा नाही. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
✐ लेक हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही. माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझा आभारी आहे. जागतिक कन्या दिन शुभेच्छा
✐ लेक वाचवा, देश घडवा. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ लेक असते ईश्वराचं देणं, तिच्या पाऊलखुणांनी सुखी होईल आमचं जिणं. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ जशी सायलीची कळी, सोनचाफ्याची पाकळी तशी माझी…जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
✐ स्वागत तुझे मी असे करावे, अचंबित हे सारे जग व्हावे, तुझ्या गोड हास्याने जीवन माझे फुलूनी जावे. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ प्रत्येक क्षण आता आनंदाने सजला, तुझ्या रूपाने माझ्या घरी सौख्याचा चरणस्पर्श झाला. जागतिक कन्या दिन शुभेच्छा
✐ माझा श्वास तू, माझा जीव तू, माझ्या जगण्यासाचा अर्थ तू माझी लाडकी छकुली. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
✐ तुझ्यामुळे मज आईपण मिळालं कसं सांगू तुला, माझ्या बकुळीच्या फुला. जागतिक कन्या दिन शुभेच्छा
✐ माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा, माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ इवले इवले हात हलवत मिचकावत होतीस डोळे, तुला कुशीत घेताच स्वर्गसुख मज झाले. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ तू फक्त नाहीस मुलगी तू आहेस श्वास माझा, उद्या जगावर राज्य करशील स्वप्न नाही आहे विश्वास माझा. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ तुझ्या केवळ अस्तित्वाने रोम रोम माझे झंकारले, तूझ्या येण्याने जीवन माझे सार्थक झाले. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ लेक लाडकी या घरची होणार राणी सासरची. कन्या दिनाच्या शुभेच्छा बेटा.
✐ माझी लेक माझी सखी परमेश्वराकडे एकच मागणं कधी नको होऊस तू दुःखी. जागतिक कन्या दिन शुभेच्छा
✐ मुलगा तोपर्यंत माझा आहे जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही. पण तु माझी तोवर आहेस जोवर माझं आयुष्य संपत नाही. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ लेक माझी भाग्याची, राजकन्या आहे घराची. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा तुझ्यामुळे कळाला मज अर्थ जीवनाचा. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ लाडाची लेक सोनुली माझी, आता होणार लवकर मीही आजी. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ भाग्यवान असतात ते लोक ज्यांच्या घरी मुली जन्माला येतात. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ एक तरी मुलगी सुनेच्या रूपात मिळावी लेकीची सर तिने थोडीतरी भरून काढावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ मुलीचा जन्म म्हणजे आनंदाची उधळण. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ प्रिय सोनु, थोडेच दिवस घरात राहिलीस पण आयुष्याभराच्या आठवणींची साठवण करून गेलीस… कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझा लाडका बाबा
✐ मुलगा जर माझ्या वंशाचा दिवा आहे तर तु माझ्या दिव्याची वात आहेस. कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, तुझा बाबा
✐ छोटी छकुली अशी असावी प्रत्येकाच्या घरी एक तरी लेक असावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा बेटा
✐ नशिबवान असतात जे लोक ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ काही झालं तरी मुलीचं पहिलं प्रेम तिचा बाबाच असतो. कन्या दिनाच्या शुभेच्छा बेटा
✐ मुलगी जेव्हा घरी जन्माला येते साऱ्या घरात आनंद आणते. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ सोड सारी चिंता आनंदात रहा बाळा, तुला रडताना पाहून तुझ्या बाबाचा लागत नाही डोळा. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ एक तरी मुलगी असावी, छोटूशी पण नखरेल भारी, नाना मागण्या पूरवताना तिच्या बाबाची अशी तारांबळ उडावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ लेक अशी असावी की तिच्यासोबत चालताना बापाची कॉलर ताठ असावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ बाबाची लाडकी लेक गोडूंली, मोठी झाली सासरी चालली… कसा जगू आता मी तान्हुल्या, बाबाची लाडकी लेक गोडूंली. तुझा बाबा
✐ मुलगी आपल्या बापाची लाडकी परीच असते. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ जगातील अनमोल रत्न म्हणजे फक्त कन्यारत्न. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ एक तरी लेक असावी कच्ची-पक्की पोळी प्रेमाने भरवण्यासाठी. कन्या दिनाच्या शुभेच्छा
✐ देव्हारातील चंदन तू, मला मिळालेलं वरदान तू. कन्या दिनाच्या गोड गोड शुभेच्छा
✐ लेकीची पसंती कळताच बाबाचं काळीज धडधडतं. चिमुकली घरटं सोडून जाणार म्हणून आतल्या आत बिचारं रडतं. कन्या दिनाच्या शुभेच्छा