स्मरण त्यागाचे
स्मरण शौर्याचे
स्मरण ध्यासाचे
स्मरण स्त्री पर्वाचे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ती आई आहे, ती ताई आहे,
ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे,
तीच सुरुवात आहे आणि
सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे..
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या उत्तुंग भरारी पुढे
गगन ही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व ते सारे वसावे..
जागितक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या प्रयत्नांना मिळू दे
यशाची सोनेरी किनार
लक्ष लक्ष दिव्यांनी
उजळू दे तुझा संसार
कर्तृत्व अन् सामर्थ्याची ओढून घे नवी झालर
स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
विधात्याची नव
निर्माणाची कलाकृती तू
एक दिवस तरी
स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा
कर तू..
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्याला स्त्री आई म्हणून कळाली
तो जिजाऊंचा शिवबा झाला
ज्याला स्त्री बहिण म्हणून कळाली
तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला
ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली
तो राधेचा श्याम झाला
आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली
तो सीतेचा राम झाला..
प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात
स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे
म्हणूनच स्त्री शक्तीला माझा सलाम
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
जन्मा येण्या कारण तू,
नात्यांमधली गुंफण तू,
दु:खाला लिंपण तू,
मायेचं शिंपण तू,
झिजतानाही दरवळणारं
देव्हाऱ्यातलं चंदन तू
स्वार्थाने या जगाला
मिळालेलं वरदान तू..
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आई, आजी,
बहिण, बायको,
मुलगी, मैत्रीण
अशा नानाविध भूमिकांतून
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी
प्रत्येक वळणावर सोबत करणाऱ्या
त्या स्त्री शक्तीला शतशः प्रणाम..